रेशन दुकानांतून काढता येणार बँकेतील पैसे !
| रेशन दुकानांतून काढता येणार बँकेतील पैसे ! |
नमस्कार मित्रांनो
आता रेशन दुकानांवर केवळ धान्यच मिळणार नाहीत तर बँकिंग सुविधाही मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच झाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी बँकिंग सुविधेचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता गावातच बँकिंग सेवा मिळतील.
जिल्ह्यात पाच
रेशन
हजार रेशन दुकाने मिळणार बँकेच्या सेवा बीड जिल्ह्यात आज घडीला १९७२ रेशन दुकाने आहेत. सध्या या दुकानावर गहू, तांदूळ लाभार्थ्यांना दिला जात आहे. आता रेशन दुकानांवर बँकिंग सेवा मिळणार आहेत.
राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका (अनुसूची-२ अंतर्गत सूचीबद्ध), इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक या विविध बँकांच्या ब्रँड अंतर्गत प्रसिद्धी आणि विपणन होईल. हे सर्व व्यवहार डिजिटल असतील. ग्राहकांच्या हाता रोख रक्कम देण्यात येईल किंवा त्यांच्या खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यावर पाठविण्यात येईल. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांना खेळते भांडवल उपलब्ध होईल.
रेशन दुकान होणार बँक आता
बँकिंग सेवेतून रेशन दुकानदारांना जो काही व्यवहार होईल त्यातून कमिशन मिळणार असल्याने त्यांना रेशन धान्य विक्रीसह बँकिंग व्यवहारातूनही कमिशन प्राप्त होईल.
कोणत्या तालुक्यात किती दुकाने? रेशन दुकाने
तालुका अंबाजोगाई।
केज
माजलगाव
२१२
१७८
आष्टी बीड
१९२
३४६ पाटोदा
परळी
१७६
१८३
१३०
६७
धारूर
गेवराई
१२०
शिरुर २५५ वडवणी
एकूण- १९७२
रेशन दुकानदारांसाठी बँकिंग ही ऐच्छिक बाब
सदरील उपक्रमासाठी रेशन दुकानदारांना संबंधित
बँकेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. संबंधित बँकेच्या वतीने या उपक्रमाच्या अंमलबजावणी,
सुविधा आणि समन्वयासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नेमून दिले जाणार आहेत. रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. बँकिंग सुविधा दुकानातून द्यायची आहे की नाही ? ही बाब रेशन दुकानदारांसाठी ऐच्छिक आहे.
रेशन दुकानदार होणार बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी
राष्ट्रीयीकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, भारत सरकार व खासगी बँक अनुसूची-२ अंतर्गत सूचीबद्ध यांच्या सेवा राज्यातील सर्व रेशन दुकानांमधून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणी तसेच इतर बाबी संबंधित करारनामा संबंधित बँक आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये करण्यात येईल. रेशन दुकानदार है। बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी होतील.
मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका धन्यवाद
पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार
https://maharashtraallyojana.blogspot.com/2023/07/------Pm-kisan-yojna%20.html
0 Comments
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधीकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनासी संबंधीत नाही कृपया या वेबसाईटला आफिसयल वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर या सारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकु नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व आभ्यगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल केली किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website वर किंवा आधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद!